मराठा आरक्षण यशस्वी लढाई ,विनोद पाटील यांनी मानले या नेत्यांचे आभारवाचा सविस्तर-

मुंबई : आपले हे ऋण कधीच विसरू शकणार नाही असे म्हणत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मानले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे आभार.

मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली असून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी संपूर्ण मराठा आरक्षण लढ्यात दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत “आपले हे ऋण कधीच विसरू शकणार नाही” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंकडे कृतज्ञता व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही “मराठा आरक्षण कायदयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं असल्याचा मला आनंद झाला आहे. सर्वप्रथम मी या वीरांचे अभिनंदन करतो” अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांचं कौतुक केलं. कोणाच्याही ताटातलं कमी न करता मराठा समाजाला हक्क मिळत असेल तर तो त्यांना मिळालाच पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपण एकजुटीने ताकद निर्माण करूया असं आवाहन यावेळी केलं.

पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात लढाई झालीच तर शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी मराठा समाजासोबत असेल असं स्पष्ट केलं. शिवाय सुप्रीम कोर्टात जाणाऱ्यांना “वादात रमण्यात अर्थ नाही” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.शिवाय मराठा समाजाची ही एकजूट तुटू देऊ नका, ही अशीच कायम ठेवा असं उद्धव ठाकरेंनी यावेळी जमलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना आवाहन केलं.

मदत केलेल्यांचे आभार मानने ही शिवरायांची शिकवण

छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे, ज्यांनी ज्यांनी आमच्या लढ्यात मदत केली त्या सर्वांचे आभार मानणे आमचं कर्तव्य आहे. काल आम्ही सर्व वकिलांचे आभार मानले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे , विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानले.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी एकमुखाने कायदा पास केला त्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार मानायला ही पाटील विसरले नाहीत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: