मनसे ची 27 जणांची पहिली यादी जाहीर, वाचा सविस्तर-

मुंबई । अखेर मनसेची पहिली यादी आज जाहिर झाली असून त्यात 27 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात महत्त्वाच्या नेत्यांना स्थान दिले असले तरी पहिल्या यादीत वरळी विधानसभेत कोणाच नाव जाहीर केलं नाही. 

आज पहिली यादी जाहीर केली असून उद्यापासून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील. वरळीतून शिवसेना नेते आदित्य ठाकरे उभे असले तरी उमेदवार द्यायचा आहे, त्याबाबत अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मनसे विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याबद्दल संशयाचे वातावरण होते. उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केल्याने मनसेदेखील विधानसभेचा फड गाजवण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.


कल्याण ग्रामीण – प्रमोद राजू रतन पाटील

कल्याण पश्चिम – प्रकाश भोईर

नाशिक पूर्व – अशोक मुर्तडक

माहिम – संदीप देशपांडे

हडपसर – वसंत मोरे

कोथरूड – किशोर शिंदे

नाशिक मध्य – नितीन भोसले

वणी – राजू उंबरकर

ठाणे- अविनाश जाधव

मागाठाणे – नयन कदम

कसबा पेठ – अजय शिंदे

सिंदखेडा – नरेंद्र धर्मा पाटील

नाशिक पश्चिम – दिलीप दातीर

इगतपुरी – योगेश शेवरे

चेंबूर – कर्णबाळा दुनबळे

कलिना – संजय तुर्डे

शिवाजीनगर – सुहास निम्हण

बेलापूर – गजानन काळे

हिंगणघाट – अतुल वंदिले

तुळजापूर – प्रशांत नवगिरे

दहिसर – राजेश येरूणकर

दिंडोशी – अरुण सुर्वे

कांदिवली पूर्व – हेमंत कांबळे

गोरेगाव – वीरेंद्र जाधव

वर्सोवा – संदेश देसाई

घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल

वांद्रे पूर्व – अखिल चित्रे

ग्लोबल न्युज नेटवर्क: