मनसेचा नवा झेंडा वादात, राजमुद्रेमुळे निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकत्याच आपला नव्या झेंड्याचे अनावरण केले. मात्र या भगव्या झेंड्यावर राजमुद्रेचा वापर करण्यात आला. यामुळे झेंडा वादात सापडला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मनसेला नोटीस बजावण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगाकडून पत्र मिळाले आहे. मनसेच्या भगव्या रंगाच्या नव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला आहे. या झेंड्याच्या अनावरणानंतर अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. मनसेने तक्रारीवर योग्य ते उत्तर देण्यास आयोगाने सांगितलं आहे.

23 जानेवारीला आयोजित मनसेच्या महाअधिवेशनामध्ये पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले होते. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा आहे. यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. याच कारणामुळे झेंडा वादात सापडला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: