मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याची यादी जाहीर, अजित पवारांना ‘देवगिरी’, अशोक चव्हाणांना ‘मेघदूत’;वाचा सविस्तर

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये अजित पवारांना ‘देवगिरी’, अशोक चव्हाणांना ‘मेघदूत’,वळसे पाटलांना ‘शिवगिरी’, अनिल देशमुख- ‘ज्ञानेश्वरी’
डॉ. राजेंद्र शिंगणे- ‘सातपुडा’, राजेश टोपे- ‘जेतवन’हे बंगले देण्यात येणार आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 10 राज्यमंत्री तर एक उपमुख्यमंत्री अशा 36 मंत्र्यांनी शपथ घेतली आहेत. आता या मंत्र्यांच्या बंगल्याची यादी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचाही बंगला बदलण्यात आला आहे. त्यांना यापूर्वी अ ९ हा बंगला देण्यात आला होता. मात्र त्याऐवजी त्यांना अवंती ८ हा बंगला देण्यात आला आहे. 

बंगल्याचं वाटप पुढीलप्रमाणे 

नवाब मलिक – अ ५ 

हसन मुश्रीफ – ब ५ 

वर्षा गायकवाड – ब ४

जितेंद्र आव्हाड – ब १

सुनील केदार – ब ७

विजय वडेट्टीवार – अ ३

अमित देशमुख – अ ४ 

उदय सामंत – ब २

दादाजी भुसे – ब ३

संजय राठोड – क १ 

गुलाबराव पाटील – क ८ 

के. सी पाडवी – क ३

संदीपान भुमरे – क ४

बाळासाहेब पाटील – क ६

अनिल परब – क ५

अस्लम शेख – क २

यशोमती ठाकूर – ब ६

शंकरराव गडाख – सुरुची १६

धनंजय मुंडे – अ ९ 

आदित्य ठाकरे – अ ६ 

राज्यमंत्री अब्दुल सत्तार – सुरुची १५ 

सतेज पाटील – सुरुची ३ 

शंभुराज देसाई – यशोधन १२ 

बच्चू कडू – रॉकीहील टॉवर १२०२

दत्तात्रय भरणे – अवंती १ 

विश्वजीत कदम – निलांबरी ३०२

राजेंद्र यड्रावकर पाटील – सुरुची २ 

संजय बनसोडे – रॉकीहील टॉवर १२०३

प्राजक्त तनपुरे – निलांबरी ४०२

आदिती तटकरे – सुनिती १० 

ग्लोबल न्युज नेटवर्क: