मंत्री मुश्रीफ यांच्या आरोपाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे चोख उत्तर

मंत्री मुश्रीफ यांच्या आरोपाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे चोख उत्तर

ग्लोबल न्युज: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा बोलविता धनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटीलच आहे असे आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केले होते. तसेच आम्ही शिव्या दिल्या तर झोपा लागणार नाही असा चिमटा सुद्धा भाजपा नेत्यांना काढला होता. आता मुश्रीफांच्या या आरोपाला पाटील यांनी कोल्हापुरात चोख प्रतिउत्तर दिले आहे.

खालच्या पातळीवर जाऊन दुषणे देण्याची पद्धत बंद करा, अन्यथा त्याचा काहीही शेवट होऊ शकतो. कोणी कोणाला धमकी देण्याची गरज नाही. कोणी कोणाला घाबरत नाही,” अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना रविवारी प्रतिउत्तर दिले.

पाटील म्हणाले, गेल्याच आठवड्यात आपण वादग्रस्त विधान करणार नाही, असे म्हणणारे हसन मुश्रीफ आज पुन्हा वेगळे बोलले आहेत. त्यामुळे त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही.गोपीचंद पडळकर यांच्या चुकीच्या विधानावर पक्षाने समज दिली होती. त्यांनी ती मान्यही केली होती. असे असताना पुन्हा शेरेबाजी सुरू करणे चुकीचे आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: