मुंबई | देशभरात कोरोना व्हायरसने कहर केला असून आतापर्यंत देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 281 वर पोहचली असल्याची माहिती मिळत आहे. तर या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 111 वर गेला आहे. देशातील 4281 रुग्णांमध्ये सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 809 वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या मुंबईत कोरोनाचे 490 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 57 नवीन रुग्ण आढळले आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात वाढत असला तरी एक दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत देशातील 318 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.