मुंबई । माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह माजी खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि कल्याणराव काळे यांच्या साखर कारखान्यांना तत्कालिन फडणवीस सरकारने हमी दिली होती. आता ही हमी अडचणीत सापडली आहे. या चार भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेली 310 कोटींची बँक हमीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
- माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे व सोलापूर जिल्हातील नेते कल्याणराव काळे यांच्याशी साखर कारखान्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने ३१० कोटी रुपयांची बँकहमी देण्याचा निर्णय घेतला होता.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून भाजप सरकारच्या निर्णयाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
- आज या चार साखर कारखान्यांना केलेल्या मदतीचा निर्णय रद्द करण्यात आला.
- विधानसभा निवडणुकीच्या आधी बँक हमी व खेळत्या भांडवलापोटी या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालिन सरकारने मदत केली होती.
- पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना, विनय कोरे यांचा श्री तात्यासाहेब वारणा साखर कारखाना व काँग्रेसमधून भाजपत गेलेले कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना यांना हमी देण्यात आली होती. ती अनुक्रमे ५० कोटी, ५ कोटी, १०० कोटी व ७५ कोटी रुपये होती.