भाजप आमदारांचा अखेर सभात्याग, विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जात आहे. त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ठाकरे सरकारची ही पहिली अग्निपरीक्षा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे, अशोक चव्हाण यांनी प्रस्ताव मांडला, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, जयंत पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी अनुमोदन दिलं. यावेळी भाजप आमदारांचा अखेर सभात्याग केला, विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकण्यात आला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: