भाजपला पंकजा मुंडेंनी  ‘या’ वाक्यातून दिला इशारा;अन प्रदेशाध्यक्षासमोर सोडले हे पद 

परळी : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथगडावर आयोजित स्वाभीमान दिवसावेळी भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील भाजप नेतृत्त्वाला आणि प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मी कुठेही जाऊन कोणतेही पद मिळवू शकते, पण गद्दारी आमच्या रक्तात नाही, असे म्हणत इतर पक्षाचे पर्याय आपल्यासाठी होते, असा इशारा पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला आहे. 

मला कोणत्याही पदाची उपेक्षा नाही आणि बेईमानी गोपीनाथ मुंडेच्या रक्तात नाही. पक्ष हा कोणाच्या व्यक्तीच्या मालकीचा नसतो. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी या पक्षाला एका उंचीवर नेले, आता अमितभाई शहा या पक्षाचे अध्यक्ष आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली एक मोठे नेतृत्व देशाला मिळाले आहे. उद्या हे देखील माणसं बदलतील. पक्ष एक प्रक्रिया आहे. हा पक्ष एका व्यक्तीचा नाही आहे. मुंडेसाहेबांना मूठभर लोकांचा पक्ष हा जनसामान्यापर्यंत पोहचवला. आपण हा रिव्हर्स गेअरमध्ये नेऊ नये, येवढीच मी विनंती करते, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला. 

आज मी कोणीही नाही, मी कोअर कमिटीची सदस्यही नाही, जर माझ्यावर पदासाठी आरोप लावला जातो की, मी पक्षावर दबाव आणते, तर मी जाहीरपणे सांगते की, मी आज भाजपच्या राज्यातील कोअर कमिटीतील सदस्यात्वाच्या जबाबदारीतून मुक्ती मागत आहे, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. 

घाबरू नका उद्धव ठाकरे माझे भाऊ – पंकजा मुंडे 

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथगडावर भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुती सुमने वाहिली.  पुन्हा एकदा एकत्र येऊन या सरकारकडे मराठवाड्यासाठी न्याय मागून आणि घाबरू नका मुख्यमंत्री माझा भाऊच आहे की हो, अशा शब्दांत पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंडे कुटुंबियांची जवळीक पंकजा मुंडे यांनी या भाषणात दाखवून दिली आहे. 

यावेळी बोलताना, पंकजा मुंडे म्हणाल्या, मला गोपीनाथ मुंडेच्या नावाने पदर पसरायचा नाही, तर हक्काने मागायचे आहे. लोकांसाठी काम करण्यासाठी गोपीनाथ मुंडेचे विचार पुढे न्यायचे आहेत. २६ जानेवारीपासून सुखदा येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे प्रतिष्ठान कार्यालय पुन्हा सुरू करणार असून २७ जानेवारीला औरंगाबाद येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. 

औरंगाबादमध्ये भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. या स्मारकाबाबत बोलताना,  उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती करते की, पाच वर्ष झाले त्यांच्या मृत्यूला आता स्मारक करू नये. आम्ही एक वीट रचू शकलो नाही.  जे स्मारक परळीत केले ते एका मुलीने केले आहे. आता गोपीनाथ मुंडेचे स्मारक करू नका,  पण आता मराठवाड्यातील शेतकऱ्याला दुष्काळमुक्त करा, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली आहे. 
 
२७ जानेवारीला एक दिवसीय उपोषण मराठवाड्याचे  करणार, शेतकऱ्यांचा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करेल.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील आहेत ते या प्रश्नांकडे लक्ष देतील अशी मला खात्री आहे, असेही स्तुती सुमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उधळली. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: