भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस, विधिमंडळाबाहेर भाजपचे शक्तिप्रदर्शन

मुंबई |भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आहे.  भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार आणि नेते विधीमंडळ परिसरात दाखल झाले. भगवे फेटे बांधून भाजपने विधीमंडळ परिसरात शक्तीप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्व आमदार आणि नेत्यांनी भगवे फेटे बांधले. यावेळी विधीमंडळ परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

विधीमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसाठी भाजपची बैठक पार पडतेय. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार बैठकीसाठी दाखल झाले आहेत. चंद्रकांत पाटीलांनी विधीमंडळ पक्ष नेतेपदाचा प्रस्ताव मांडला. विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला. तसंच मुनगंटीवारांसह 10 आमदारांनी यावेळी अनुमोदन दिले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: