| नवी दिल्ली:राज्यातील राज्यसभेच्या ७ जागा मोकळ्या होत आहेत.दरम्यान या निवडणुकांसाठी १३ मार्च पर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.तर २६ मार्चला निवडणूक आणि निकाल लागणार आहे.यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने ही देशातील विविध राज्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
दरम्यान राज्यात भाजप कोणाला संधी देते?,याबाबत चर्चा सुरू होती.अखेर भाजपने राज्यसभेसाठी देशातील तसेच राज्यातील उमेदवार जाहीर केले आहेत.महाराष्ट्रातून भाजपने २ नेत्यांना उमेदवारीची घोषणा केली आहे.
साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.तर रीपाई नेते रामदास आठवले यांना पण भाजपने उमेदवारी दिली आहे.तर आजच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना पण भाजपने मध्यप्रदेश मधून उमेदवारी जाहीर केली आहे