भाजपाने विधान परिषदेचा एक उमेदवार बदलला? कोणाला दिली उमेदवारी
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत धक्कातंत्र वापरण्याचे तंत्र भाजपने शेवटपर्यंत कायम ठेवत आधी जाहीर केलेले अजित डाॅ. गोपछ़डें ऐवजी दुसराच उमेदवार दिला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी अर्ज माघारी घेतला आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून रमेश कराड भाजपचे चौथे उमेदवार असतील. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.
विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (11 मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबतच भाजपकडून रमेश कराड यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार केलं.
रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला.
मराज्यात कोरोनाचे संकट फोफावत असताना विधानपरिषद निवडणुकांमुळे राजकारण देखील मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. भाजपमध्ये उमेदवारीवरून चांगलेच अंतर्गत वाद सुरु आहेत. दरम्यान, भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना भाजपने उमेदवारी दिली.
भाजपने अजित गोपछडे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके यांचे अर्ज ८ तारखेला दाखल केले होते. तसेच म्हणून रमेश कराड आणि संदीप लेले यांना डमी अर्ज भरण्यास सांगितले . मात्र आता रमेश कराड हे मुख्य उमेदवार म्हणून भाजपने निवडले आहेत.