मुंबई । भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत केवळ चार नावांचा समावेश आहे. असे असले तरी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री विनोद तावडे यांचे नाव या यादीतही नसल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
पक्षाने आपल्याला तिकीट देणार नसल्याचे सांगितलं, असं खुद्द एकनाथ खडसेच माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. तरीही पक्षावर माझी निष्ठा असून पक्ष निश्चितच चांगला विचार करेल, असे विधान त्यांनी गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणारे विनोद तावडे यांनाही पक्षाने गॅसवर ठेवल्याचे चित्र आहे.
भाजपची तिसरी यादी
शिरपूर – काशीराम पावरा
रामटेक – डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी
साकोली – परिणय फुके
मालाड पश्चिम – रमेशसिंग ठाकूर
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi