भंडारदरा धरण 100 टक्के भरले,वाचा सविस्तर-

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे भंडारदरा धरण आज तांत्रिकदृष्ट्या भरले असे जलसंपदा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. दैनिक सार्वमतने आज भंडारदरा धरण तांत्रिक दृष्ट्या भरणार असल्याचे व्रुत्त प्रसिद्ध केले होते.

दरम्यान धरण भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. धरणाचा पाणीसाठा 10 हजार 500 दलघफू झाला. धरणातून सद्या वीजनिर्मिती द्वारे 825 क्यूसेक, तसेच स्पिलवे द्वारे 3 हजार 600 क्यूसेक असे एकूण 4 हजार 425 क्यूसेक ने धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे.

मागील वर्षी 9 ऑगस्टला धरण भरले होते. भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग निळवंडे धरणात येणार असल्यामुळे लगेच प्रवरा नदीतील प्रवाह वाढणार नाही. निळवंडे धरणाचा पाणीसाठा 4 हजार 500 दलघफू आहे. निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येईल.

प्रवरा नदीकाठच्या गावांना सध्या कूठल्याही प्रकारचा धोका नाही. धरणातील विसर्ग वाढवताना वेळोवेळी महसूल व पोलीस विभागांना कळवण्यात येईल असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.

admin: