ब्रेकिंग : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या ; चित्रपटसृष्टीवर शोककळा

ब्रेकिंग : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या ; चित्रपटसृष्टीवर शोककळा

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवले आहे. त्यांच्या निधनाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रायगडमधील कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत त्यांनी आपले जीवन संपवले असल्याचे समजते. तिथे ते मृतावस्थेत सापडले आहेत.

९० च्या दशकांमध्ये बहुचर्चित तमस या दुरदर्शनवरील आपल्या कारकिर्दिला प्रारंभ केला होता. त्यानंतर १९९४ मध्ये १९४२ लव्ह स्टोरी या चित्रपटाने त्यांनी स्वतंत्रपणे बॉलिवूडमध्ये काम करण्यास प्रारंभ केला.

यानंतर बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून त्यांची अल्पावधीत ख्याती झाली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दित लगान, जोधा-अकबर, देवदास, प्रेम रतन धन पायो आदी चित्रपटाच्या लोकप्रियतेत नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनचा मोठा वाटा होता.

त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेविश्व हादरुन गेले आहे. नितीन यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास केला जात आहे.

२००५ मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे ५२ एकर (२१ हेक्टर) मध्ये पसरलेला एनडी स्टुडिओ सुरु केला. जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल आणि कलर्सचा रिअॅलिटी शो बिग बॉस यासारखे चित्रपट होस्ट केले आहेत. याठिकाणी त्यांनी विविध भव्यदिव्य सेट उभारले होते. त्याठिकाणीच देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: