ग्लोबल न्यूज- बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूतने मुंबईत आपल्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो ३४ वर्षाचा होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे.
सुशांत डिप्रेशनमुळे औषधे घेत होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले आहे. काल रात्री सुशांतबरोबर त्याचे काही मित्रही त्याच्याबरोबर होते. सकाळी सुशांतने जेव्हा दरवाजा उघडला नाही. तेव्हा त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला. त्यावेळी सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकत होता. त्यानंतर त्याच्या नोकराने पोलिसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत.
सुशांतने आपल्या कारकीर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. सर्वांत आधी त्याने ‘किस देश में है मेरा दिल’ नावाची मालिका केली होती. त्यानंतर त्याला खरी ओळख एकता कपूरची मालिका ‘पवित्र रिश्ता’ यातून मिळाली.
त्यानंतर त्याने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने ‘काय पो छे’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे मोठे कौतुक करण्यात आले होते.
त्यानंतर तो ‘शुद्ध देसी रोमांस’मध्ये वाणी कपूर आणि परिणीती चोप्राबरोबर दिसला होता. परंतु, तो सर्वाधिक चर्चेत राहिला तो टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीवर आधारित ‘एम. एस. धोनी, अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटामुळे. सुशांतचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती.
सुशांतने ‘क्या पो चे!’ हा चित्रपट प्रदर्शित केला. बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सुशांतच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सुशांतचा दुसरा चित्रपट ‘शुद्ध देसी रोमांस’ होता. या चित्रपटात त्याने एका रोमँटिक मुलाची भूमिका केली होती.
त्याचबरोबर सुशांत हा सोनचिडिया आणि छिछोरेसारख्या चित्रपटात दिसला होता. त्याचा शेवटचा चित्रपट हा ‘केदारनाथ’ हा होता. यात तो सारा अली खानबरोबर दिसला होता. मागील आठवड्यातच त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिचा देखील अचानक मृत्यू झाला होता.