बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प पुढे ढकलता येईल का? याचा विचार सुरू – जयंत पाटील

मुंबई । बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प पुढे ढकलता येईल का?, याचा विचार सुरु असल्याचे मत कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राज्य सरकार हे माहित करुन घेण्याचा प्रयत्न करत आहे की, राज्यामध्ये 4 लाख 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. ते पाहता बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प पुढे ढकलता येऊ शकतात का? याचा विचार सुरु आहे असे, जयंत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रावर 4 लाख 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याचसोबत वेगवेळे प्रकल्प सुरु केले आहेत. त्याचे 2 लाख कोटींचे कर्ज आहे. किती प्रकल्पाचे पैसे राज्य सरकारला परत फेडीसाठी जबाबदारी येणार आहे. याचा अंदाज घेण्यसाठी बैठक बोलावली. शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी काही प्रकल्प आवश्यक आहे. काही प्रकल्प उशिरा घेता येतात का याचा विचार आम्ही करत आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: