बा विठ्ठला, कोरोना ला हद्दपार कर…!
*छायाचित्रकार-पत्रकार सुनील उंबरे यांच्या कलाकृतीतून पंढरी
पंढरपूर,- यावर्षी लाखो भाविक आषाढीवारीपासून वंचितत राहणार आहेत.पंढरीत न येताही वारकऱ्यांनी कोरोना संकटातून मुक्ती देण्याचे साकडे विठ्ठलाला घातले आहे.. बा विठ्ठला, कोरोनाला हद्दपार कर, अशी श्रद्धापूर्वक याचना विठुराया कडे केली आहे.
वारकऱ्यांची उपस्थिती पंढरीत नसली तरी त्या परिसराचे दर्शन प्रसारमाध्यमे आपापल्या पद्धतीने घडवीत आहेत. महाराष्ट्रातील घातक ख्यातनाम छायाचित्रकार- पत्रकार सुनील उंबरे यांच्या कलात्मक नजरेने ती सजावट व वातावरण टिपले आहे…
खास विठुरायाच्या भक्तगणांसाठी... आम्ही आपल्या पुढ्यात ठेवत आहोत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रा २०२० निमित्त श्री विठ्ठल सभामंडप रुक्मिणीमाता सभामंडप नामदेव पायरी व मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे….*