बार्शी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा शहराध्यक्ष जीवनदत्त आरगडे यांनी केली पक्षाकडे मागणी
बार्शी: एखादा दुसरा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या स्थापनेपासून बार्शी तालुका हा सदैव कॉंग्रेस पक्षाच्याच विचारांसोबत राहिला आहे. ज्या ठिकाणी साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे त्या बहुतेक जागांवर आजही कॉंग्रेस पक्षाची कुठेही पिछेहाट झालेली दिसत नाही.
बार्शी शहर व तालुक्याचे साक्षरतेचे प्रमाण व नुकत्याच पार पडलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात सगळीकडे तब्बल वीस ते पंचवीस हजार पेक्षा जास्त मतांनी सेना भाजप आघाडीवर आहे मात्र एकमेव बार्शी तालुका फक्त दोन हजारांच्या आत सेना भाजप या युतीला आघाडी मिळाली आहे. सध्या बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभावा आहे त्यामुळे बार्शीची जागा काँग्रेस पक्षाला सोडावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड़ जीवनदत्त आरगडे यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस चा उमेदवार असतांनाही कॉंग्रेस ने स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविली, कॉंग्रेस ने घरोघरी जे कुटुंब संवाद अभियान राबविले ते आहे. व मतदारांनी कॉंग्रेस च्या नव्या चेह-यांकडे पाहून पुन्हा एकदाा विचारांना मतदान केले. त्यामुळे इतर मतदार संघात असलेला फरक बार्शीत पडलेला दिसत नाही.
2009 साली कॉंग्रेस पक्षाकडून ही जागा लढविली गेली होती त्यावेळी दोन नंबरची मते कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मिळाली होती. पक्षाची विचारधारा व विचारांना साजेशी प्रतिमा असलेला तरुण उमेदवार असेल तर या मतदार संघात कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रवादी पेक्षा जास्त वाव आहे. मागील काही वर्षांपासून स्वयंचलित घंटानाद आंदोलन, बुडबुड घागरी, दलितांच्या न्यायासाठी रास्तरोको , शेतकरी पीकविमा कर्जमाफीबाबतची आंदोलने अशी अनोखी आंदोलने तसेच, ठेवीदार व गुंतवणूकदार संघटना, कामगार संघटना, फेरीवाला संघटना,शाळानिहाय पालक संघटना, रिक्षावाला संघटना, पीक वीमा शेतकरी संघटना,सावकार पिडित कर्जदार संघटना, विविध गाव निहाय विविध कार्यकारी सोसायटी कर्जदार संघटना अशा विविध संघटना काढून त्यांच्या विविध प्रश्नांवर कॉंग्रेस बाशीर्चे शहर अध्यक्ष अॅड. जीवनदत्त आरगडे यांनी आक्रमक भूमिका घेत पिडीत वंछिताना न्याय देऊन संघटनेची बांधणी केलेली आहे ,तसेच पक्षाची बांधणी केलेली आहे त्यामुळे हा मतदारसंघ आम्हाला सोडावा असा दावा आरगडे यांनी केला आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.