बार्शी-लातूर राज्यमार्गावर पांगरी जवळ अपघात दोन जण ठार, 25 जखमी

पांगरी : बार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीपासून एक कि मी अंतरावर खांडसरी पाटीजवळ लक्झरी ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टरचा अपघात झाला. यात दोन जागीच ठार एक जण गंभीर जखमी झाले. याच अपघातात २५ प्रवासी  किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली.जखमीवर सोलापूर येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
 
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, देगलूरकडून मुंबईकडे येडशी पांगरीमार्गे येणारी ट्रॅव्हल्स (एम एच  ०४ जेपी ७७१)  ५ मे च्या रात्री बाराच्या सुमारास पांगरीपासून दोन किलोमीटर अंतरावर खांडसरी पाटीजवळ ट्रॅक्टरला धडक दिली.  समोरून चारा घेऊन जाणारा ट्रॅक्टर (एमएच १३/एए-६९१८) हा येडशीकडे जात असताना समोरासमोर जोरदार धडक झाली. ट्रॅव्हल्स चालक सागर विजयकुमार रेशमी (जिल्हा बिदर) आणि एक प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

admin: