बार्शी येथे मतदान अधिकाऱ्यास कामाच्या ताणातून हृदय विकाराचा झटका, अतिदक्षता विभागात उपचार सुरू.

बार्शी : दुसऱ्या टप्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असून उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात मतदान सुरू असताना बार्शी शहरातील राजर्षि शाहू महाराज नगरपालिका शाळा क्र ६ येथील मतदान केंद्र क्रमांक १३५ मधील मतदान अधिकारी सिध्दनाथ निळकंठ पाटील (गजानन विद्यालय, सोलापूर, रा.बकाले नगर, सोलापूर) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

मतदान अधिकारी सिध्दनाथ पाटील यांना तात्काळ मतदान केन्द्रातील राजकीय पक्षाच्या कार्यकर्यांनी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मागील दोन दिवसांपासून सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी कामात आहेत. आज सकाळी ७ प्रत्यक्षात पासून मतदानास सुरवात झाली आहे. त्याआधी पहाटे ५.३० पासून कर्मचारी कामात आहेत. याच कामाच्या तानातून पाटील यांना हृदय विकाराचा झटका आला.

प्रशासनाचीही तत्परता…

सिध्दनाथ पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच तात्काळ १३५ नंबर मतदान केंद्रात पर्यायी कर्मचारी दिला तसेच सिध्दनाथ पाटील यांच्या जवळ दवाखान्यात बसण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

admin: