बार्शी तालुक्यातील रस्त्यांसाठी 60 कोटीं निधी मंजूर, सोलापूर व उस्मानाबाद रस्त्यांची ही होणार दुरुस्ती

गणेश भोळे

बार्शी :  तालुक्यातील ग्रामीण  रस्त्यासह बार्शी-सोलापूर व परंडा उस्मानाबाद या रस्त्यांच्या दुरुस्ती साठी 59 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

 बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी विधिमंडळा च्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सन 2019-20 च्या अर्थसंकल्पा मध्ये 9 कोटी 50 लाख रुपये व बार्शी-सोलापूर 63 किमी.या रस्ता दुरुस्तीकरिता 25 कोटी, आणि सोलापूर जिल्ह्यातील दौंड-करमाळा-परंडा-बार्शी-उस्मानाबाद या राज्य राज्य मार्गासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्याची तरतूद पुरवणी अर्थसंकल्पात केली असून लवकरच रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत.     

  बार्शी तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत हे सतत प्रयत्नशील असून यापूर्वीही त्यांनी तालुक्यातील रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून घेतलेला आहे.अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी व तरतूद केलेल्या रस्त्यांची नावे व निधी पुढील प्रमाणे-          गोरमाळे-नारी-इंदापूर -उपळे दु-मुंगशीआर.-रातंजन-हिंगणी-धामणगाव शेळगाव आर. या 8 किमी.रस्त्याकरिता 4 कोटी रुपये.            बार्शी हद्द ताडसौदणे-मांडेगाव-देवळाली ते जिल्हा हद्द या 5 किमी.रस्त्याकरिता 1कोटी 50 लाख रुपये.                                          काटेगाव-चारे-पाथरी-पांगरी-कारी ते जिल्हा हद्द या 5 किमी. रस्त्याकरीता 1कोटी 50 लाख रुपये.              अंजनगाव येथील बार्शी हद्द -श्रीपत पिंपरी-कोरफळे -पानगाव-साकत पिंपरी या 5 किमी.रस्त्याकरिता 2 कोटी 50 लाख रुपये. बार्शी सोलापूर या 63 किमी.रस्ता दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपये.                   सोलापूर जिल्ह्यातील
दौंड-करमाळा-परंडा-बार्शी-उस्मानाबाद
रस्ता दुरुस्तीकरीता 25 कोटी रुपये. 

  सदरील रस्त्याची कामे मंजूर करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी सतत पत्रव्यवहार करून या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.

मागणी केलेली बहुतांश सर्व कामे मार्गी लावली असून मागील आठवड्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सव्वा नऊ कोटी मंजूर झाले होते आता आणखी 60 कोटी मिळाल्याने सदरील कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे राजाभाऊ राऊत यांनी बार्शी तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त केले.

…………………

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

धिरज करळे: