पुरंदर । बार्शी तालुक्यातील सर्जापुरचे सुपुत्र व भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब मारुती जाधव यांना, पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल 26 जानेवारी 2020 रोजी विशेष सेवापदक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आल आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे पदक देवून सन्मानित करण्यात आले. अण्णासाहेब जाधव हे गेल्यावर्षी पासून भोर उपविभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून सासवड येथील कार्यालयात कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते गडचिरोली येथे कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये चांगली सेवा, कठीण व खडतर कामगिरी केल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी देण्यात येणारा विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब मारुती जाधव यांनी गडचिरोली येथे पोलीस आणि जनता यांच्यामधील संबंध सुधारणे, सामाजिक उपक्रमात सहभाग, नक्षलविरोधी कारवाईत सहभाग यांसह अन्य सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात मोलाचे योगदान दिले. पोलीस प्रशासन व सामाजिक बांधिलकी यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. पुरंदरमध्ये आल्यानंतरही त्यांचा सामाजिक उपक्रमात मोठा सहभाग असतो. शालेय मुलांना मदत, आपदग्रस्तांना मदत व तरूणांना मार्गदर्शन करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात.