गौडगांव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले,
बार्शी तालुक्यात दुष्काळ पडल्याने सन २०१८-१९ या वर्षातील अजून पर्यंत बार्शी तालुक्यातील सुमारे ४३०३६ हजार शेतकऱ्यांना आनुदान मिळालेले नाही,त्यामुळे सदर दुष्काळा अनुदान त्वरित देण्यात यावे या मागणी साठी ३० डिसेंबर रोजी बार्शी तुळजापूर रोड वरील गौडगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याबाबत या पुर्वी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी बार्शी तहसील कार्यालय येथे उपोषण करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी दुष्काळ अनुदान वितरित केल्यानंतर वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वाटप करण्यात येईल अशा आशाचे लेखी पत्र तहसिलदार यांनी दिले होते. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना या अनुदानाविषयी नुसतीच प्रतीक्षा करावी लागत आहे.
बार्शी तालुक्यात दुष्काळ निधी पात्र शेतकऱ्यांची संख्या साधारण ८८ हजार ११४ एवढी असून अद्यापर्यंत ३८ कोटी ५६ लाख ९७ हजार एवढा निधी देखील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे, पण उर्वरित ४३०३६ हजार शेतकऱ्या करता ३९ कोटी ५१ लाख ७३ हजार ८० रुपये निधीची मागणी केल्याची माहिती मंडळ अधिकारी तांबोळी महमंदहनिफ यांनी लेखी पत्र रस्ता रोको आंदोलन करता वेळी दिले त्या वेळी अरुण सुगावकर पोलिस निरीक्षक वैराग , वाघमारे टी. एस तलाठी उपस्थीत होते.