बार्शीत मंडल  अधिका-यास मारहाण,  पाच जणांवर गुन्हा दाखल ,वाळूचा टिपर पकडण्यास गेले होते अधिकारी


 बार्शी :   शहरातील मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळ सहा ब्रास वाळु भरूण उभ्या असलेल्या टिपरवर  तहसीलदारांच्या आदेशाने कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडल  अधिका-यास टिपर मालकाने मारहाण करून बोलेरो गाडी बोलावुन घेऊन त्यांच्या अंगावर घालुन  जप्त करण्यात  आलेला टिपर पळवुन नेल्याचा प्रकार आज गुरूवारी घडला.शंकर सरवदे  व अन्य अनोळखी चौघांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंडल  अधिकारी उमेश हरिश्चद डोईफोडे वय 37 रा.शिवाजी नगर बार्शी यांनी फिर्याद दिली आहे. 
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि 
मल्लिकार्जुन मंदिराच्या पुर्व बाजुस बेकायदेशीर पणे वाळुने भरलेला हायवा टिपर उभा असल्याची माहिती तहसीलदार यांना खब-यामार्फत मिळाली होती. त्यामुळे त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे तोंडी आदेश तहसीलदार यांनी मंडल  अधिका-यांना दिले. त्यानुसार ते सरकारी वाहनाने बार्शी तहसिलचे जेलर किरण अनंतराव भालेराव,पोलिस कर्मचारी शिवाजी शिंदे व गाडीचे चालक अहमद अली मोहमदअली सय्यद असे चौघेजन प्राप्त माहितीच्या ठिकाणी गेले असता तेथे 42 हजार रूपये किंमतीची 6 ब्रास वाळु भरलेला हायवा थांबलेला होता. त्यांनी वाळु व 18 लाख रूपये किंमतीचा हायवा वाहन पंचनामा करूण  ताब्यात घेऊन याबाबत तहसीलदार यांना कळवले. 
  थोडयाच वेळात तहसिल कर्मचारी गाडीत बसलेलेले असताना शंकर सरवदे हा तेथे आला. तेव्हा डोईफोडे यांनी सदर हायवा कोणाचा आहे असे विचारले असता त्याने तो हायवा माझे मालकिचा आहे असे सांगितले. तेव्हा त्यास सदर हायवातील वाळु बाबत रॉयल्टी भरलेची पावती आहे काय अशी विचारपुस केली असता माझेकडे पावती नाही तुम्ही माझे काय वाकडे करायचे ते करा, तुम्हाला पकडण्यासाठी आमचीच गाडी दिसते का? असे म्हणून सर्वांना शिविगाळ करण्यास सुरवात केली. नंतर त्याने त्याचा ड्रायव्हरला बोलावून घेतले.

 डोईफोडे हे सरकारी गाडी मध्ये बसलेलेले असताना सरवदे याने त्यांच्याशी हुज्जत घालुन शिविगाळ केली.तसेच त्याने बोलवलेल्या हायवाच्या ड्रायव्हरला तु वाळू खाली करून हायवा घेवुन जा माझे कोण वाकडे करायचे ते करू दे असे सांगितले.तसेच शंकर सरवदे याने डोईफोडे यांना सरकारी गाडीतुन खाली ओढुन खाली पाडुन पोटावर व पायावर लाथ मारून जेलर भालेराव यांचेशीही झटापट केली. त्यानंतर सरवदे याने तहसिल कर्मचा-यास मारण्यासाठी आणखीन काही माणसे बोलावली असता थोड्याच वेळात काळ्या रंगाच्या बोलेरो वाहन क्रमांक एमएच 13 सी जी 5757 या गाडीमधुन अनोळखी तीन इसम आले.   शंकर सरवदे याने आलेल्या त्या गाडीतील इसमांना उद्देशुन याला पकडण्यासाठी माझीच गाडी दिसते काय? असे म्हणून याला आता जिवंत सोडायचे नाही, याचे अंगावर गाड़ी घाला रे असे सांगितले. त्या तिघांनी त्यांचे ताब्यातील बोलेरो गाडी डोईफोडे यांच्या अंगावर घातली असता ते शंकर सरवदे यास ढकलुन बाजुला सरकले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले.या दरम्यानच्या झटापटीमध्ये डोईफोडे यांच्या अंगावरील कपडे फाटले असुन पायास मुका मार लागला आहे.
   तहसिल कर्मचा-यांनी ताब्यात घेतलेल्या हायवातील वाळू त्याच ठिकाणी खाली करून रिकामा हायवा चालकाने जबरदस्तीने पळवून नेला.दरम्यान पोलीसांना फोन केला असता शंकर सरवदे व गाडीत आलेले अनोळखी तिघेजण यांनी बोलेरो गाडी जागेवरच सोडुन तेथुन तुम्हाला बघुन घेतो असे म्हणुन पळून गेले.याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी शंकर सरवदे यास ताब्यात घेतले असुन अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संदिप जोरे हे करत आहेत

चौकट

कारवाई साठी गेलेल्या मंडल अधिकारी उमेश डोईफोडेसह चार जणाच्या पथकावर शंकर सरवदे सह अन्य ४ जणांनी केलेल्या हल्यामुळे बार्शी तहसील कर्मचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज दिवसभरासाठी कामकाज बंद ठेवुन निषेध नोंदवला .तसेच आरोपींना अटक केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार असा निश्चय केला आहे.

admin: