कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार नागरिकांच्या काळजीसाठी सर्व त्या उपाययोजना करत आहे.या व्हायरस ची लागण होऊ नये यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये एक मीटर चे अंतर ठेवावे या प्रशासनाने केलेल्या सूचनेनुसार बार्शीतील उपळाई रोडवरील शेलार किराणा दुकान या शॉपिंने एक मीटर अंतरावर उभे राहून किराणा माल विक्री सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी तसे वर्तुळ ही आखले आहेत.
विश्वातल्या संपूर्ण जनतेवर कोरोनाचं महाभयंकर संकट आलेलं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक आणि व्यक्तीगत पातळीवर आपण एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
बार्शीत देखील उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी संचारबंदी ची चोख अंमलबजावणी सुरू केलेली आहे. जर अत्यावश्यक तातडीचे काम असेल तरच घराबाहेर पडा,गर्दी करू नका असे आवाहन केले आहे.