बार्शीत ऐच्छिक रक्तदान चळवळ वाढवणारी रामभाई शहा रक्तपेढी झाली 42 वर्षांची

गणेश भोळे

बार्शी : ग्रामीण भागात मागील बेचाळीस वर्षापासून अखंडीतपणे रक्तदान चळवळ विशेषतः ऐच्छिक रक्तदाते निर्माण करण्याचे काम बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीने अखंडीतपणे केले आहे. दरवर्षी ऐच्छिक रक्तदात्याच्या मदतीने रक्तपेढीच्या वतीने सुमारे 13 ते 14 हजार रक्त पिशव्या संकलित करण्यात येतात. व त्याचे विघटन करून सुमारे 45 ते 50 रक्त घटक गरजू रूग्णांना उपलब्ध करून दिले जातात. जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने बार्शीच्या श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या मागील चार दशकाच्या यशस्वी वाटचालीचा घेतलेला आढावा…

बार्शी शहर व जवळच्या खेड्यामध्ये रक्तदान शिबीरे घेवून रक्तदानाचे महत्व जनतेला पटवून देवून रक्तदानाची चळवळ सुरु केली. गावोगावी ,शाळा-महाविद्यालयात जावून रक्तदानाचे महत्व पटवून देण्यासाठी व्याख्याने दिली.रक्तदानाबद्दल बरेच समज-गैरसमज होते ते या कार्यामुळे दूर झाले.

रक्तपेढीचे उत्कृष्ट कार्य असून ही रक्तपेढी आज अत्यंत उत्कृष्ट सेवा देत आहे. रक्त  संकलन करण्यासाठी रक्तपेढीने स्वःताची दोन मोठी व्हॅन घेतली असून ती पूर्णपणे वातानुकुलीत व सर्व प्रकारच्या सोयीने युक्त आहे.

रक्तपेढीत पुढील सुविधा उपलब्ध आहे.

रक्तावर केली जाणारी सर्वांत महत्वाची चाचणी नॅट चाचणी ही उपलब्ध आहे. संपूर्ण संगणीकृत रक्तपेढी आहे.. भारतात प्रथमच ज्येष्ठ नागरिक पूढील रुग्णांना रक्ताची गरज लागल्यास सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करुन देणारी प्रथम रक्तपेढी आहे.

बार्शी व परिसरातील गरजू  पेंशटच्या नातेवाईकांना रक्तपेढी पर्यंत येण्याची गरज पडत नाही तर रूग्णांना जागेवर रक्त पुरवले जाते. महाराष्ट्रात प्रथमच अशी सोय आपल्या रक्तपेढीने केली आहे. तसेच रक्तपेढी तर्फ थॅलिसमिया आणि हिमोफिलाया रुग्णांना सतत मोफत रक्तांचा पुरवठा केला जातो. रक्ताच्या सर्व प्रकारच्या अत्यावश्यक चाचण्यासाठी अद्ययावत मशनरीज उपलब्ध आहेत.

100% रक्तविघटन केले जाते. आता एैच्छिक रक्तदात्यांसाठी प्रथमच रक्तपेढी आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यासाठी एक लहान मोबाईल व्हॅन आहे. रक्तदात्यांनी आता रक्तपेढी मध्ये येण्याएैवजी एक फोन ने मोबाईल व्हॅन त्यांच्यी दारी जावून रक्त घेतले जाते. 

चोवीस तास सेवा

रक्तपेढीच्या वतीने  रक्तदान करके देखो अच्छा लगता है. रक्तदान भारत,सर्वांसाठी सुरक्षित रक्त असा नारा या या रक्तपेढीने ग्रामीण भागात कार्य करुन सिध्द केला आहे. या रक्तपेढीमध्ये मेट्रो शहरातील सर्व सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यंत कमी खर्चात व 24 तास उपलब्ध करुन देण्याचे महत्वाचे कार्य करीत आहे.

धिरज करळे: