बार्शीत अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च
बार्शी :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढण्यात आला. शुक्रवार दि १८ रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळात हा रूट मार्च झाला .
या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी तसेच इतर ४ पोलीस निरीक्षक. ८ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १०० पोलीस कर्मचारी, सी आय एस एफचे ३ अधिकारी व ५० कर्मचारी, आंध्रप्रदेश पोलीस चे दोन प्लाटून, शीघ्र कृती दलाचे जवान तसेच १०० होमगार्ड असे सुमारे पंधरा अधिकारी व ३०० कर्मचारी यांनी रूट मार्चमध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी उपअधीक्षक भोरे व पोलीस निरीक्षक गिरीगोसावी म्हणाले, निवडणूक मतदान वेळी संपुर्णपणे मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्या द्वारे संवेदनशिल मतदान केंद्रांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदारांची ने-आण करण्यास बंदी आहे. अशा प्रकारची वाहने आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. रात्री १०.३० वाजेनंतर विनाकारण शहरांमध्ये फिरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रचारादरम्यान वाहनांवरती तसेच इतर ठिकाणी लावण्यात आलेले पक्षाचे चिन्ह उमेदवारांचे फोटो तसेच इतर आक्षेपार्ह लिखाण तात्काळ काढून टाकावे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi