बार्शीतील हमाल-तोलार बांधवाना हक्काचे घर देणार:राजेंद्र राऊत

बार्शी : देशाच्या जडण-घडणीमध्ये व प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच कष्टकरी हमाल-तोलार असूूून बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल-तोलार बांधवांसाठी पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत घर देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
बाजार  समितीच्या मालकीच्या लातूर रोड येथील जमिनीमध्ये 700 हमाल-तोलार बांधवांसाठी पंतप्रधान आवास घरकुल योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी भाजपा नेते माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आज बाजार समितीत हमाल-तोलार संघटनेचे पदाधिकारी,सदस्य, बांधव यांच्याशी बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली.
या कष्टकरी बांधवाना  लवकरच हक्काचे घरकुल देण्याचे अभिवचन राजेंद्र राऊत यांनी दिले.याबरोबरच बाजार समितीमधील हमाल भवन या इमारतीच्या कडेने संरक्षक भिंत बांधणे,इमारतीस नविन रंगकाम करणे या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत,व्हा.चेअरमन झुंबरदादा जाधव,संचालक रावसाहेब मनगिरे मालक,बापूसाहेब शेळके,वासुदेव बापू गायकवाड,आण्णासाहेब चोरघडे,बापूसाहेब गोडसे,सचिन जगझाप,पिंटू घोडके,हमाल-तोलार संचालक चंद्रकांत मांजरे व हमाल संघटनेचे पदाधिकारी,सदस्य,बांधव उपस्थित होते.

admin: