जातीवाचक उदगार काढणाऱ्याना मुख्यमंत्री पुरून उरले-पंकजा मुंडे

बीड : भाजपचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बीडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजपच्या नवनियुक्त खासदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढील वर्षी ही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असतील असे भाष्य केलं आहे.

मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे, या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने याआधी मोठी चर्चा झाली होती. याबाबतच बोलताना आता पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री महोयदयांना आज सांगू इच्छिते, आधी लोकांच्या मनातील विषय त्यांनी मांडले होते. पण मी आता तुम्हाला शुभेच्छा देते की आपण पुढच्या वर्षीही मुख्यमंत्री म्हणून या मंचावर उपस्थित असाल. आणि त्यासाठी महाराष्ट्रभर जिथं जिथं मला जावं लागेल तिथं मी जाणार आहे.’

विरोधकांवर जोरदार निशाणा

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘काही नेते स्वत:ला राजा, महाराजा, जाणता राजा म्हणून घेतात. पण याच लोकांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांबद्दल जातीवाचक उद्गार काढले होते. पण अशा लोकांना मुख्यमंत्री पुरून उरले,’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

admin: