बार्शीतील जगप्रसिध्द नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ बी एम नेने यांचे वृध्दापकाळाने निधन
बार्शी: बार्शीतील जगप्रसिध्द नर्गिस दत्त मेमेरियल कॅन्सर हॉस्िपटलचे संस्थापक चेअरमन डॉ़ भगवान उर्फ शरद महादेव नेने यांचे वृध्दापकाळाने पुणे येथे उपचार सुरु असताना निधन झाले़त्यांचे वय ८० वर्षे होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,जावई असा परिवार आहे.
डॉ़ नेने यांना फुफुसाचा आजार होता़ त्यांना दम लागत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्िपटलमध्ये उपचार सुरु होते़ अखेर आज सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १०४० रोजी मिरज येथे झाला़ सेंट झेव्हियर्स कॉलेज मुंबई येथे इंटरसायन्स पुर्ण केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण ग्रँन्ट मेडिकल जे़जे़ हॉस्पिटल मुंबई येथे घेऊन १९६२ साली वैद्यकीय पदवी मिळवली़तर पुढे एम़डी़ मेडिसीन ही पदवी प्राप्त केली़१९७१ मध्ये लंडन येथे एमआरसीपी ही वैद्यकीय शिक्षणातील उच्च पदवी घेतली.
मायदेशी येऊन डॉ़ हिरेमठ हॉस्पिटलमध्ये वैद्कीय सेवा सुरु केली़ अचून निदानाचे वरदान लाभलेले डॉ नेने यांनी त्याकाळी चार जिल्ह्यातील रुग्णांना सेवेचा लाभ झाला़ अनेक डॉक्टर त्यांचा सल्ला घेत होते़ त्यांनी टी़बी़ मधुमेह,व ह्दयरोगांच्या रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले.
१९९ ० साली दिल्लीत झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत बर्न
इंज्युरी या विषयावर शोध निबंध सादर केला़ ही सेवा देत असताना विविध रोगांवरील वैद्यकीय शिबीरेही आयोजित केली़ त्यांच्या कार्याची दखल २००४ साली प्रकाशित झालेल्या वर्ल्ड कॅन्सर अहवालामध्ये कॅन्सर हॉस्पिटलविषयी गौरवोदगार काढलेआहेत़ इंटननॅशनल बायोग्राफी सेंंटर ग्रेट बिटन यांनी द वर्ल्ड हा पुरस्कार देऊन ही गौरवले आहे.
कर्करोगाच्या निदानासाठी आणि उपचारासाठी त्यांना सुविधांचा अभाव लक्षात आला आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू केले.आज या कॅन्सर हॉसिपटलध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत़ ग्रामीण भागात असलेल्या या कॅन्सर हॉस्पिटलमुळे हजारो रुग्णांची सोय झाली आहे़ त्यानी आपल्या वैशिष्ट्यापलीकडे आणि कर्तव्याची काळजी पलीकड कार्य केले आहे.
संचालक मंडळ आणि मित्रांच्या मदतीने टाटा मेमोरियल सेंटर, श्री सुनील दत्त आणि डॉ. पी.बी. देसाई, त्यांनी बार्शी येथे नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल स्थापन केले.
आणि यशस्वीरित्या संशोधन व मदतकार्य सुरू केले.
वयाच्या ८० व्या वषीर्सुद्धा ते या क्षेत्रात अथक काम करत होते़ आणि या सर्वांसाठी त्यांना पगार, फी, मानधन यासारखे मोबदला कधी घेतला.
नाही. कर्करोगाचे कार्य त्याच्यासाठी एक मिशन, दृष्टी आणि स्पप्न होते.बार्शीकर त्यांना वैद्यकीय क्षेत्राती भगवंत म्हणून ओळखायचे़कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा असाध्य असा रोग असला तरी समाजात
जनजागृती करून योग्य वेळेत निदान आणि योग्य उपचार करत कॅन्सरसारख्या जीवघेण्या रोगावर मात करण्याचे प्रयत्न बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटलमार्फेत यशस्वीपणे केला
जात आहेत.
१९८२ साली बाशीर्सारख्या छोटयाशा शहरात कॅन्सरवर संपुर्ण आधुनिक पद्धतीने उपचार करणारे ग्रामिण भागातील एकमेव हॉस्पीटल
सुरू करण्यात आले. जेष्ठ धन्वंतरी व कॅन्सर हॉस्पीटलचे प्रमुख डॉ.बी.एम.नेने यांनी बार्शी शहराचे माजी नगराध्यक्ष स्व. बाबुराव कथले यांच्या सहकायार्तून या हॉस्पीटलचा पाया रचला. स्व बाबुराव
कथले यांनी बार्शी नगरपरिषद हद्दीतील ७ एकर जागा कॅन्सर हॉस्पीटल उभारणीसाठी दान म्हणून दिली.
यांची साथ मोलाची
कॅन्सर हॉस्पिटलच्या या वाटचालीत त्यांना माजी आ प्रभाताई झाडबुके व दिलीप सोपल तसेच
बन्सीधर शुकला यांची मोलाची साथ लाभली़
डॉ. नेने यांनी टाटा स्मारकचे संचालक पी.बी. देसाई यांच्या सहकार्याने अश्विनी रुरल कॅन्सर रिसर्च व रिलिफ सोसायटी अंतर्गत नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटलची स्थापना करण्यात
केली. एस.यु कथले ट्रस्ट बार्शी, टाटा स्मारक केंद्र मुंबई भाभा अणुशक्ती केंद्र, सुनिल दत्त, रतन टाटा,नवलमल फिरोदिया ट्रस्ट अशा समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी निस्वार्थीपणाने या हॉस्पीटलला मदतीचा ओघ चालू ठेवला. तितक्याच तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करत अनेक रुग्णांना कॅन्सरमुक्त करण्याच काम या हॉस्पीटलने यशस्वीपणे संभाळले आहे.
सोलापूर जिल्ह्याबरोबरीने उस्मानाबाद, लातूर, परभणी, औरंगाबाद, सांगली, सातारा अशा अनेक भागातून उपचारासाठी एक आश्वासक ठिकाण म्हणून या हॉस्पिटलने नावलौकिक मिळवला आहे.
शेकडो पुरस्काराची यादी
त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल रतन टाटा यांनी हॉस्पीटलला भेट देऊन आर्थिक सहकार्य तर केलेच परंतू त्यांना
गोल्ड मेडल देऊन गौरवले़ याशिवाय अमेरिका, फ्रान्स, चीन,थायलंड, केनिया आदी देशात त्यांचे सत्कार झाले़ महिलांच्या आरोग्यविषयी कार्य केल्याबद्दल २८ फेब्रुवारी २००४ रोजी त्यांना भारत
सरकाराचा विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा राष्ट्रीय पारितोषीक व १ लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला होता़ ही रक्कम त्यांनी कॅन्सर हॉस्िपटला दिली़ बार्शीतील नाकोडा जैना सेवा मंडळाचा भगवान
महावीर सेवा, उस्मानाबादच्या भाई उध्दवराव पाटील ट्रस्टचाजीवनगौरव पुरस्कार,आधार महाराष्ट्र भूषण,बार्शी नगरपालिकेचा बार्शी भूषण,संत सेवा मंडळ कुर्डूवाडी यांचा वैद्यकीय
सेवा पारितोषीक असे सुमारे दिडशे ते दोनशे सन्मान पुरस्कार मिळवलेले ते बार्शी व परिसरातील एकमेव डॉक्टर होते़लंडनच्या रॉयल कॉलेजने डॉ़ नेने यांना फेलोशिप २००० साली प्रदान केली.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शिबिरे
त्यांनी २०१६ ते २०१८ या दोन वर्षात जिल्ह्यातील अकरा तालुक्यात ७७ ग्रामीण रुग्णालयात मोफत कर्करोग निदान शिबीरे घेऊन गर्भायश, स्तनाचा व
तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची मोफत तपासणी केली़ यात निदान झालेल्या सर्व कॅन्सर रुग्णांना बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले.
पद्मश्री ची खंत राहिली
डॉ़ नेने यांचे कार्य हे पद्मश्री किंवा महाराष्ट्र भूषण
पुरस्कारापेक्षा मोठे कार्य होते़ मात्र त्यांना हे दोन्ही
पुरस्कार मिळाले नाहीत हे बार्शीकरांचे दुर्भाग्यच म्हणावे-लागेल.