बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी देणार

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी देणार

बार्शी: बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आपले एक महिन्याचे वेतन 1 लाख 82 हजार 200 रुपये, हे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी देण्याचे जाहीर केले. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांना ते चेक देणार असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे देशातील व महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व सरकारी अधिकारी,कर्मचारी यांनी आपले एक दिवसाचे वेतन न देता एक महिन्याचे वेतन कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी द्यावे अशी विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी केली. जेणेकरून कोरोना संकटामुळे देशावर व महाराष्ट्रावर येणारा आर्थिक ताण व भार कमी करण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.

यापूर्वी करमाळया चे आमदार संजय शिंदे उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील यांनीही एक महिन्याचे वेतन कोरोना ग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले आहे.

नागरिकांनी संचार बंदी आहे याचा विचार करून कोरोना पसरू नये यासाठी घरातच थांबावे बाहेर पडू नये सर्व नियम हे आपल्या भल्यासाठी आहेत. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: