बार्शीची जागा शिवसेनेकडे दिलीप सोपलांचा एबी फॉर्म तानाजी सावंताकडे

बार्शीची जागा शिवसेनेकडे, दिलीप सोपलांचा एबी फॉर्म तानाजी सावंताकडे

बार्शी: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली असून रात्री उशिरा महायुतीच्या जागावाटपाची घोषणा झालेली झालेली असेल तेंव्हा बार्शीची जागा कोणत्या पक्षाला सुटलेली असेल हे देखील स्पष्ट झालेले असेल़ मिळालेल्या महितीनूसार बार्शीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली असल्याचे वृत्त असून बार्शीतील शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांचा पक्षाचा एबी फॉर्म जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे दिला असल्याचे दिलीप सोपल यांनी स्वत: सांगीतले.

गेल्या अनेक दिवसांपासून महायुती होणार की नाही, तसेच बार्शीची जागा कोणाला सुटणार याबाबत तर्कवितर्क सुरु होते़ युतीची घोषणा होण्याअगोदर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एबी फॉर्मचे वाटप केले़ मात्र बार्शीचा फॉर्म अद्याप दिलेला नव्हता़ त्यामुळे बार्शीत नेमके काय होणार याबाबत अनिश्चिता होती.

दुपारी तानाजी सावंत यांनी परांडा मतदारसंघासाठी स्वत:चा एबी फॉर्म घेतला़ त्यांनी रविवारी रात्री माजी आमदार दिलीप सोपल यांना फॉर्म घेण्यासाठी मुंबईला या असा निारोप दिला होता़ मात्र सोपल यांनी तुम्ही मुंबईत आहातच तर माझा फॉर्म ही तुमच्याशिवाय दुसरा कोण आणणार, मी ही प्रचारात अडकलेलो आहे़़ त्यामुळे तुम्हीच माझा फॉर्म घेऊन या असे सांगीतल्याने मंत्री तानाजी सावंत यांनी तो घेऊन ठेवला असल्याचे दिलीप सोपल यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.

राऊत अपक्ष लढणार
महायुतीची घोषणा झाली आहे़ परंतू जागावाटप रात्री उशिरापर्यंत निश्चीत झालेले नव्हते़ परंतू सोपल यांनी आपल्याला एबी़ फॉर्म मिळाल्याचे सांगीतल्यामुळे या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे़ परंतू अधिकृत घोषणा झालेली नाही़ आता राजेंद्र राऊत हे अपक्ष लढणार हे देखील निश्चीत झाले आहे़ नव्हे तर त्यांनी महायुतीचे तिकीट सोपल यांना मिळणार हे गृहीत धरुन अपक्ष लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे़.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: