बारावीच्या परीक्षेत दिव्या रसाळ राज्यात पहिली,बार्शी तिथे सरशी

बार्शी – शहरातील फटाका स्टॉल व्यापारी बापू रसाळ यांची नात दिव्या किशोर रसाळ हिने 12 वी परीक्षेत कला विभागात महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. दिव्याने कला शाखेत 96-00 % गुण मिळवत पुन्हा एकदा बार्शी तिथंसरशी असल्याच सिद्ध करून दाखवलं आहे.

दिव्याने संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले असून भविष्यात IAS होण्याचे स्वप्न असल्याचे बार्शी टाईम्सशी बोलताना सांगितले. दिव्या हिरेमठ हॉस्पिटलजवळील गवसाने प्लॉट येथील रहिवाशी आहे.

दिव्याने न्यू हायस्कुल म्हणजेच शेठ अगरचंद कुंकूलोळ प्रशालेतून दहावीची परीक्षा पास केली होती. त्यावेळीही 88 % गुण मिळवून दिव्याने मोठं यश प्राप्त केलं होतं. त्यानंतर, पुढील शिक्षणासाठी उस्मानाबाद येथील श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला. यंदा 12 वी कला शाखेतून 96 टक्के गुण मिळवून ती उस्मानाबाद जिल्ह्यासह राज्यात प्रथम आली आहे. विशेष म्हणजे तिने 12 वी साठी कोणताही क्लास लावला नव्हता, वर्षभर नियमित अभ्यास करून हे यश मिळवले आहे. तिच्या यशात तिचे भाऊ लखन शेरकर परिवार, हर्षल शिरशी परिवार व शाळेतील सर्व विषय शिक्षक , प्राचार्य यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले

“कोणत्याही क्लास शिवाय कला शाखेत 96 % गुण मिळू शकतात हे तिने सिद्ध केले. यशासाठी भरमसाठ पैसे भरुन क्लासमागे फिरणाऱ्या विद्यार्थ्यांनी तिचे अनुकरण करणे गरजेचे आहे.” तिच्या या यशामुळे उस्मानाबाद व बार्शी शहरात तीचे कौतुक होत आहे. त्यामुळे रसाळ परिवारासह संपूर्ण बार्शीकरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.

admin: