बारामती जिंकण्यासाठी मी डबल फळाचा नांगर घेऊन आलो आहे-राम शिंदे

इंदापूर: बारामती जिंकण्यासाठी मी सुध्दा डबल फळाचा नांगर घेऊन आलो आहे. असा खोल लावतो की, बारामतीत चारी मुंड्या चित नाही केलं. तर नाव सांगणार नाही असा हल्लाबोल राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे तयांनी शरद पवारांवर नाव न घेता केला.
कांचन कुल यांच्या इंदापूर मधील सांगता सभेला भाजपच्या इतर नेत्यांसोबत राम शिंदेनीही उपस्थिती लावली. शेवटच्या बारा तासाच्या अल्टीमेटमध्ये कोणाला महायुतीत यायचे असेल तर आत्ताच या, परत सकाळी कोणाला जागा नाहीअसे ही शिंदे म्हणाले.

आता झालयं असं की, आभाळचं इतक फाटलयं की, ठिगाळ लावता कुठं कुठं अस म्हणत युतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी सुळेंवर निशाना साधला.

admin: