ऑण्टिग्वापासून सुरू झालेला ‘टीमइंडिया’च्या विजयाचा सिलसिला सलगसहाव्या कसोटी क्रिकेट सामन्यातही कायमराहिला. कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही कच्चालिंबू असलेल्या बांगलादेशची पहिल्या कसोटीसामन्यात हिंदुस्थानच्या भेदक गोलंदाजीपढेदाणादाण उडाली अन् तिसऱ्याच दिवशीत्यांचा खेळ खल्लास झाला. विराट कोहलीच्या‘टीम इंडिया’ने एक डाव 130 धावांनीदणदणीत विजय मिळवत आम्हाला कसोटीक्रिकेटमध्ये ‘नंबर वन’ का म्हणतात हेपाहुण्यांना दाखवून दिले. द्विशतकवीर मयांकअग्रवाल या सामन्याचा मानकरी ठरला.याचबरोबर हिंदुस्थानने दोन सामन्यांच्यामालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडीघेतली.
मुश्फिकुरची अर्धशतकी खेळी
आघाडीची फळी फ्लॉप ठरल्यानंतर मधल्याफळीतील मुश्फिकुर रहीमने अर्धशतकी खेळीकरीत बांगलादेशचा पराभव लांबविला. त्याने 150चेंडूंच्या संयमी खेळीत 64 धावा करताना 7चौकार लगावले. त्याने लिटन दाससोबत (35)सहाव्या विकेटसाठी 63, तर मेहदी हसनच्या (38)साथीने सातव्या गडय़ासाठी 59 धावांची भागीदारीकेली. त्यामुळेच बांगलादेशचा दोनशे धावांचा टप्पाओलांडता आला. रविचंद्रन अश्विनने लिटन दासलास्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद केले, तर मेहदीहसनचा उमेश यादवने त्रिफळा उडवला.मुश्फिकरची झुंजार खेळीही अश्विननेचपुजाराकरवी झेलबाद करून संपुष्टात आणली.हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने 4, तर रविचंद्रनअश्विनने 3 फलंदाज बाद केले. उमेश यादवने 2बळी टिपले, तर इशांत शर्माने 1 गडी बाद केला.
कोहलीने मोडला धोनीचा विक्रम
कर्णधार विराट कोहलीने शनिवारी आणखी एकविक्रम आपल्या नावे केला. प्रतिस्पर्धी संघालासर्वाधिक 10 वेळा डावाने पराभूत करून त्यानेमहेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले. धोनीच्यानेतृत्वाखाली हिंदुस्थानने नऊ वेळा डावाने विजयमिळवलेला आहे. याचबरोबर मोहम्मद अझरुद्दीनव सौरभ गागुंली यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थाननेअनुक्रमे 8 व 7 वेळा प्रतिस्पर्धी संघाला डावाने धूळचारलेली आहे.
स्वतःच्याच विक्रमाशी बरोबरी
विराट कोहलीने कर्णधार या नात्याने सलग सहावाकसोटी विजय साजरा करून स्वतःच्याच सहावर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली. ‘टीमइंडिया’ने विंडीजमध्ये दोन सामन्यांची कसोटीमालिका 2-0 फरकाने, तर त्यानंतरद.आफ्रिकेविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांचीमालिका 3-0 फरकाने जिंकली होती. आताहिंदुस्थानने बांगलादेशला पहिल्या कसोटीतपराभूत करत स्वतःच्याच विक्रमाशी बरोबरी केली.
संक्षिप्त धावसंख्या
बांगलादेश पहिला डाव 150 धावा.
हिंदुस्थान पहिला डाव 6 बाद 493 (घोषित)
बांगलादेश दुसरा डाव
सर्व बाद 213 (मुश्फिकुर रहीम 64; मोहम्मद शमी16-7-31-4, रविचंद्रन अश्विन 14.2-6-42-3).