बंडखोरांपैकी 15 आमदार संपर्कात – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई । राज्यातील जनेतेने दिलेला कौल मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले. त्यांनी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार असा विश्वास व्यक्त केला. साताऱ्यातून उदयनराजे आणि परळीमधून पंकजा मुंडे यांचा पराभव धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे –

विरोधी पक्षाला जागा अधिक मिळाल्या तरी प्रबळ झालेला नाही, सदृढ लोकशाहीसाठी सक्षम विरोधी पक्षाची गरज

हा आकडा वाढू शकतो. 

बंडखोरांपैकी 15 आमदार संपर्कात

दोन्ही पक्षातील बंडखोरीचा फटका

परळी विधानसभेचा निकालही धक्कादायक

सातारा लोकसभेचा निकाल धक्कादायक

महायुतीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक

गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा भाजपचा स्ट्राईक रेट जास्त, मतदानाची टक्केवारीही जास्त

पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जनतेचे आभार

महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट कौल दिला

महायुतीला स्पष्ट कौल दिला

पुन्हा सरकार महायुतीचे होणार कुणाच्या मनात शंका नाही

पीम मोदी आणि अमित शहा तसेच कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्वांचे सहकार्य लाभले

आमचा स्ट्राईक रेट मागील निवडणुकीपेक्षा चांगली

काही ठिकाणी जागा कमी जास्त झाल्या, पण कामगिरी चांगली झाली

ग्लोबल न्युज नेटवर्क: