धक्कादायक निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले, – महाराष्ट्राच्या जनतेनं डोळ्यात अंजन घातलं

मुंबई । राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा जाहीर झाला आहे. राज्याच्या जनतेने महायुतीला काहीसा झटका दिला असून महाआघाडीच्या पदरी यश दिलं आहे. आतापर्यंत आलेल्या निकाला नुसार भाजप-शिवसेना महायुतीला 159 जागा मिळाल्या आहेत. तर महाआघाडीने 98 जागा मिळवत 2014च्या निवडणुकी पेक्षा अभूतपूर्व यश मिळाले आहे. जाहीर झालेल्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने डोळे उघडणारा निकाल दिला आहे. त्यामुळे आम्ही जनतेचे आभारी आहोत. महायुतीला स्पष्ट बहुमत असले तरी आता मुख्यमंत्री पदा बाबत पुढच्या बोलणीला सुरवात होणार आहे. लोकसभा निवडणुकी वेळीचं अमित शहा यांच्या बरोबर फॉर्म्युला ठरला होता. त्यामुळे त्याबाबत बैठक घेऊन चर्चा होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे –

दुसऱ्याचे चांगले झाले म्हणून पोटात दुखणारा मी नाही

असेच आशिर्वाद कायम आमच्यासोबत असू द्या

जनता आदित्यला प्रेम देतेय, आशिर्वाद देतेय त्यासाठी मी जनतेसमोर नतमस्तक होतोय.

ईव्हीएमबाबात आता कुणाच्याही मनात शंका नसेल

अत्यंत पारदर्शकपणे चर्चा करून सत्ता स्थापनेचा दावा करू

असाच महाराष्ट्र मला अपेक्षित आहे

महाराष्ट्राच्या जनतेने डोळ्यात अंजन घातलं आहे.

गरज भासली तर अमित शहा यांच्यासोबत बैठक होईल

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यासोबत बसून तो फॉर्म्युला ठरवावा

जो फॉर्म्यला ठरलेला तो भाजपने समोर आणावा

मात्र आता त्यांच्या अडचणी वाढत असतील तर मी सर्व समजू शकत नाही. माझाही पक्ष मला वाढवायचा आहे

लोकसभेच्या वेळी 50-50 ठरला होता. जागाही 144-144 जागा ठरल्या होत्या. मात्र भाजपच्या अडचणी मी समजून घेतल्या होत्या

रोजचे जे प्रश्न आहेत ते डोळ्यासमोर ठेवून काम करावे लागले, जनतेसमोर नतमस्तक होऊन काम करावं लागेल

अत्यंत जबाबदारीने सत्ताधाऱ्यांना काम करावे लागेल

आमच्या सर्वाचे डोळे जनतेने उघडलेयत

लोकं माजायला लागतात तेव्हा त्याचे पाय जमीनीवर ठेवण्याचे काम जनता करते

जनतेने लोकशाही जिवंत ठेवली

सत्ता स्थापन करता येतील एवढ्या जागा महायुतीला दिल्या आहेत.

महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आभार

कोणत्याही दडपणाला बळी न पडता जनतेने मतदान केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: