फनी चक्रीवादळ ग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षयकुमार ची 1 कोटींची मदत

एकीकडे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच दुसरीकडे त्याने ‘फनी’ चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. अक्षय कुमारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1 कोटी रुपये जमा केले आहेत. ‘हिंदुस्तान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्याने नेटिझन्सच्या निशाण्यावर आलेला अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा आपण दर्यादिल असल्याचे सिद्ध केले आहे. अक्षयने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1 कोटी रुपये जमा केले असून फनी चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. फनी चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका ओडिशा राज्याला बसला असून आतापर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. फनीमुळे पाणीटंचाई आणि वीजपुठरठा खंडित झाल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून जीवनाश्यक वस्तू गरजुंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
अक्षय कुमारने याआधी देखील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी भरघोस मदत केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘भारत के वीर’ या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठीच्या सहाय्यता निधीसाठी 5 कोटी रुपये दिले होते. तसेच चेन्नईमध्ये 2015 मध्ये आलेल्या महापुरावेळी त्याने 1 कोटींची मदत केली होती.केंद्र सरकारकडून 1000 कोटी
फनी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसलेल्या ओडिशा राज्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. फनी वादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी फनी वादळाच्या तडाख्यामधून सावरण्यासाठी ओडिशा राज्याला 1 हजार कोटींची मदत तत्काळ जाहीर केली.

admin: