फडणवीस सरकारच्या काळातील या मंडळावरील अशासकीय नियुक्त्या ठाकरे सरकारकडून रद्द

मुंबई: सरकार बदलले की महामंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या जुन्या नेमणुका ही रद्द केल्या जातात. त्यानुसार फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्या आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर फडणवीस सरकारने शासनाच्या विविध समित्या, मंडळांवर अशा अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येत आहेत. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्याही रद्द केल्या आहेत. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी (ता.१९) यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मधील कलमान्वये महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे संबंधित महसूल विभागातून बाजार समित्यांच्या सभापतींमधून फडणवीस सरकारने या नियुक्त्या केल्या होत्या. त्यापैकी अमरावती, नाशिक, पुणे आणि कोकण या विभागातील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या ६ जून २०१७ ला करण्यात आल्या होत्या.  नागपूर महसूल विभागातील नियुक्त्या १८ जानेवारी २०१८ ला करण्यात आली होती.


खालील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या
मोहन उत्तमराव इंगळे (सभापती, धामणगाव बाजार समिती, जि.अमरावती)
नारायण बाजीराव पाटील (सभापती, दौंडाईचा बाजार समिती, जि.धुळे)
भाऊसाहेब भगवान गायकवाड (सभापती, आटपाडी बाजार समिती, सांगली)
रवींद्र नारायण घोडविंदे (सभापती, कल्याण बाजार समिती, जि.ठाणे)
रुपचंद रामकृष्णजी कडू (सभापती, उमरेड बाजार समिती, जि. नागपूर)

ग्लोबल न्युज नेटवर्क: