पोलिसांच्या मारहाणीत झाला 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, उमरगा पोलिसात ग्रामस्थांचा ठिय्या

उस्मानाबाद | उमरगा तालुक्यात तालमोड येथे एका वृद्ध शेतकऱ्याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे. पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत ही घटना घडली. रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी उमरगा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ग्रामस्थ हे पहाटेपासूनच मृतदेहासहीत पोलीस स्टेशनमध्ये ठान मांडून बसले आहेत.

उमरगा तालुक्यातील तलमोड येथे रविवारी सायंकाळी एका चारचाकी वाहनाचे टायगर फुटून गँसचा स्फोट झाला होता. या वाहनाने पेट घेतल्याने वाहनातील दोघांचा जळून मृत्यू झाला होता. यावेळी तलमोड येथील काही युवकांनी पोलीस जिपवर दगडफेक करुन पोलीसांच्या वाहनांची काच आणि अग्निशमन दलाची गाडी आडवी केली होती. या घटनेचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाने बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे या घटनेतील आरोपींनी पकडण्यासाठी तपास सुरू केला होता. ते तलमोड येथे गेले. येथून त्यांनी पाच दहा युवकांना पकडले. यामध्ये दत्तू मोरे नावाच्या व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थ याप्रकरणी पोलिसांवर आरोप करत आहेत.

admin: