पोटातील भुकेच्या प्रेरणेमुळे आयुष्य घडले : सिंधुताई सपकाळ

बार्शी : 1400 हून अधिक अनाथ मुलांचा सांभाळ करताना 282 मुलींचे आणि 49 मुलांचे विवाह करत 350 हून अधिक गारी सांभाळल्रा. 750 पुरस्कार मिळवित 4 वेळा राष्ट्रपतींकडून सन्मानित झाले. 22 देशांचा प्रवास केला. पोटातील भुकेच्या प्रेरणेमुळेच माझे आयुष्य घडले, असे उद्गार ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ रांनी काढले.

भगवंत मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत भगवंत जयतीनिमित्ताने आरोजित व्याख्यानमालेत आईच्या काळजातून या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी संयोजक संस्थांचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सनदी अधिकारी अविनाश सोलवट, प्राचार्य सुग्रीव गोरे,उद्योजक विकास भालके, बार असो चे अध्यक्ष ऍड अविनाश जाधव, विश्वास देशमुख, दिलीप गांधी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

प्रास्ताविकामध्ये संतोष ठोंबरे यांनी मातृभुमी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत वधू-वर सूचक केंद्र मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुुरु करण्रात आल्याचे सांगितले. गणेश शिंदे यानी या अ‍ॅपची माहिती दिली. अविनाश सोलवट यानी सिंधुताईच्या कार्याचा परिचर करुन दिला. 

यावेळी सिंधु अभिमान साठे ते सिंधुताई सपकाळ हा प्रवास कसा झाला हे सांगत आपल्या जीवनातील विविध हृदरस्पर्शी प्रसंग सिंधुताईंनी सांगितले. सपकाळ रांनी 11 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर गरोदर असताना 20 व्या वर्षी पतीने घराबाहेर काढले. गुराच्या गोठ्यात एका मुलीला जन्म दिला. रेल्वेच्या डब्यात फिरुन भीक मागितली. तिकिटासाठी पैसे नसल्यामुळे एका बसमधून उतरविण्यात आले.याच बसवर वीज पडली, माझा पुर्नजन्म झाला. स्वत:च्या मुलीबरोबरच अनाथांना सांभाळायाला सुुरुवात केली. कार्य वाढविले. मांजरी बुद्रुक रेथे शासनाने 9 एकर जमीन दिली. अनेक अडचणींना तोंड देत अनाथालयाची उभारणी केली. मुले-मुली स्वत:च्या पायावर उभी केली. शेकडो अनाथ मुले राज्यात विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहेत, याचा अभिमान वाटतो. ज्या सासर आणि माहेरने हाकलले, त्या गावात 8 मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये सत्कार झाला. महिलांनी शिक्षण घ्यावे, स्वावलंबी व्हावे. कठीण प्रसंगात डगमगू नरे. समाजात वावरताना शालीनतेने आणि हिंमतीने वागावे, अंगप्रदर्शन टाळावे, विवाह आणि मातृत्व ही मोठी जबाबदारी आहे.  महिलांवर कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे महिलांनी प्रयत्नवादी व्हावे, असे आवाहन त्यानी केले. 

रावेळी सिंधुताई सपकाळ रांनी आपल्या कार्याला मदत करण्याचे आवाहन करताच सभागृहात उपस्थित सर्वस्तरातील नागरिकांनी रोख रकमा व मदतीचे धनादेश उत्सफुर्तपणे दिले. व्याख्यान माला यशस्वी करण्यासाठी मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भगवंत मल्टीस्टेट च्या टीमने परिश्रम घेतले.

admin: