पै.विकास राऊत ठरला नागनाथ केसरीचा मानकरी, मळेगावात पार पडले यात्रेनिमित्त कुस्ती मैदान
बार्शी: मळेगाव ता.बार्शी येथील ग्रामदैवत नर्मदेश्वर नागनाथ महाराज यांच्या यात्रेची सांगता कुस्तीने करण्यात आली. शेवटच्या अटीतटीच्या कुस्तीच्या चाललेल्या लढाईमध्ये विकास राऊत या मल्लने अंगद बुलबुले या मल्लाला चितपट करून नागनाथ केसरीचा किताब पटकवला.राऊत याला माळी परिवारा तर्फे मनाची गदा व रोख आकरा हजार रुपये देण्यात आले.
या मध्ये सोलापूर,पुणे,उस्मानाबाद,लातूर,नगर,आदी भागातील मल्लनी सहभाग नोंदविला,कुस्त्या पाहण्यासाठी यावेळी पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन उपस्थित होते,यावेळी जनकल्याण जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बाळासाहेब माळी यांचा देवस्थान ट्रस्ट तर्फे मैदानात सत्कार करण्यात आला. मनाची गदा ही श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देश मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी व प.स.माजी सदस्य प्रशांत गडसिग यांच्या शुभहस्ते देण्यात आली.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अंकुश माळी,सरपंच गुणवंत मुंढे,बी. जि.शिर्के कंपनीचे वरिष्ठ अकाऊंटंट सुभाष टोंपे,माजी सैनिक राजकुमार दळवी,उद्दोजक राजकुमार मुबरें,मंडळाचे संजय माळी, यशदाचे शिवाजीराव पवार,यशोदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रशीद कोतवाल,पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी,सोसायटी चे अध्यक्ष बाबुराव बाबर,सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी,प्रताप गडसिग,प्रा.संजय माळी,अकबर शेख,संपत पाडुळे, समाधान पाडुळे,काकासाहेब साडफळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंच म्हणून शिवाजी पाडुळे जनार्दन खांडेकर,आजीनाथ गाडे,प्रल्हाद दळवी,अमोल पवार,गिरीश माळी, शहाजी आधारे यांनी काम पाहिले.