पूरग्रस्तांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मदत, रुक्मिणी मातेच्या 5 हजार साड्यासह 61 लाखाचा हातभार

पंढरपूर- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पूरग्रस्तांना 61 लाख रुपयांची मदत करणार असल्याची माहिती अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे पुरामुळे 12 जण मृत्युमुखी पडले, तर 6 जण बेपत्ता आहेत. या पूरबाधितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाखाची मदत मंदिर समिती करणार आहे. त्यासाठी 36 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.तसेच 5 पुरबाधित गावे दत्तक घेऊन, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांची म्हणजेच एकूण 25 लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.प्रशासनाशी सल्लामसलत करून लवकरच पुनवर्सनाची पाच गावे निश्चित केली जाणार आहेत.

सांगली जिल्ह्यामधील पूरग्रस्त महिलांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर च्या वतीने श्री रुक्मिणी मातेस अर्पण झालेल्या 5000 साड्या मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन साड्याचा टेम्पो रवाना करण्यात आला.

याबाबत समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, इतर सर्व सदस्य, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले व विशेषतः महिला सदस्या शशकुंतला नडगिरे, अँड.माधवी निगडे व नगराध्यक्षा सधना भोसले यांनी निर्देश दिले होते.

त्यानुसार सदर साड्यांचा टेम्पो सांगली येथे मार्गस्थ होताना करण्यात आला. यावेळी मंदिर समिती सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिरे कर्मचारी उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: