पुण्यात तृतीयपंथी करत आहेत वारकऱ्यांची… वाचा सविस्तर

पुणे | पुणे शहरात  माऊली व तुकोबांच्या  पालख्यांचे आगमन झाल्यानतंर प्रत्येकजण तन मन धनाने वारक-यांची सेवा करण्यास आतुर असतो .ठिकठिकाणी पाणी वाटप,मोफत औषधे वाटप,जेवणाची व्यवस्था केली जाते पण याहुन वेगळी सेवा करणारे गणेश पेेठेतील तृतीयपंथी असुन त्यांनीही वारक-यांची सेवा करण्यास कोणतीही कसुर सोडलेली नाही.

गणेश पेठेतील ख्वाजासराओ का डेरा मठातील तृतीयपंथी गेल्या वीस वर्षापासुन पालख्यासोबत येणा-या वारक-यांसाठी जेवणाची आणि मोफत औषधांची व्यवस्था करत आहे.

शहरात एकुण चारशेहुन अधिक तृतीयपंथी आहेत. त्यांनी दिलेल्या स्वनिधीतुन वारक-यांना जेवण,औषधे दिली जातात. जेव्हा पालखी शहरात येथे तेव्हा पेठांमधील परिसर हा टाळ-मृदांगाने दुमदुमून जातो.

अशातच वारक-यांची सेवा करण्या करीता सकाळपासुनच जेवणाची तयारी हे तृतीयपंथी करत असतात. विशेष म्हणजे वारकर-यांना चपाती ऐवजी त्याना आवडेल. अशी भाकरी, घनसाळ तांदळाचा भात, खर्डा, भाजी हे सर्व तृतीयपंथी स्वता बनवतात. आणि त्यांना प्रेमाने वाढतात. जालना,परभणी,बीड,येथुन दरवर्षी वारकरी येत असतात. त्यांनाही याचा आनंद वाटत असतो.

अनेकदा या तृतीयपंथीयाना दुय्यम स्थान दिले. याची सल मनात न ठेवता ख्वाजासराओ का डेरा या मठातील तृतीयपंथी गेल्या वीस वर्षापासुन वारक-यांची सेवा करत असतात याचे समाधान इथल्या तृतीयपंथ्यांना आहे.

अशा उपक्रमाचे वारक-यांनी स्वागत केले असुन वारक-यांनी मात्र हे आपलेच आहेत याच भावनेतुन तृतीयपंथी यांनी प्रेमाने दिलेला अन्नाचा घास पोटी उतरवुन पाडुंरंगाची सेवा केल्याची भावना वारकरी मनात ठेवून पुढे वारी करायला निघालेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: