नितीन गडकरी: ‘वाढत्या वयामुळे अडवाणींऐवजी अमित शहांना संधी’ #5मोठ्याबातम्या

वाढत्या वयामुळे अडवाणींऐवजी अमित शहांना संधी- नितीन गडकरी
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पहिल्या यादीत लालकृष्ण अडवाणींना स्थान दिलेले नाही. त्यावरून भाजपवर टीका होऊ लागली आहे. मात्र वाढतं वय आणि प्रकृतीचं कारण देत भाजपच्या केंद्रीय संसदीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतला असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

ख्राइस्टचर्च मशीद हल्ल्यात गेलेल्या भारतीयांच्या मन हेलावून टाकणाऱ्या कथा
केसरी : जेव्हा फक्त 21 शीख 10,000 पठाणांविरोधात लढले
अडवाणी आमचे मार्गदर्शक आहेत आणि कायम मार्गदर्शक राहतील. लालकृष्ण अडवाणी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यामुळे पक्ष त्यांचा आदर करतं. मात्र अडवाणी यांनी वयाची नव्वदी ओलांडली आहे. त्यामुळे वाढतं वय लक्षात घेता त्यांच्या जागी दुसऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं ते म्हणाले.

admin: