पाकिस्तानच्या तीन तोफा भारतीय लष्करानं केल्या नष्ट, व्हिडिओ जारी

नवी दिल्ली | भारत पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय लष्कराच्या चौक्यावर उखळी तोफांसह गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले.

यावेळी जम्मू काश्मीरातील करमरा गावात तीन जिवंत तोफा सापडल्या होत्या. आता या तोफा भारतीय लष्कराने नष्ट केल्या आहेत. उखळी तोफा नष्ट करतानाचा एक व्हिडीओ ‘एएनआय’ने जारी केला आहे.

सोमवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानकडू वारंवार असे केलं जात आहे. जम्मू काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान सैरभैर झाला आहे. भारताकडून पाकिस्तानच्या शस्त्रसंधीला सडेतोड उत्तर दिले जात आहे.

पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचेही प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, रविवारी पाकिस्तानकडून सीमेवर आगळीक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय लष्कराने जबरदस्त कारवाई करत पाकला उत्तर दिले आहे. याच कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. यामध्ये जम्मू काश्मीरमधील करमरा गावात तीन पाकिस्तानी उखळी तोफा आढळून आल्या. याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर जवानांनी या तोफा नष्ट केल्या आहेत. या तोफा नष्ट करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: