बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात आजपासून रविवारपर्यंत (ता. १९ जानेवारी) ‘कृषिक’ या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उदघाटन झालं.
या कृषी प्रदर्शनातून बळीराजाला विकासाची नवी दृष्टी, प्रगतीची नवी वाट आणि आत्मविश्वास नक्की मिळेल, असा माझा विश्वास आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो चुकवू नका…आपल्या शेतशिवाराला विकासाचं तोरण बांधण्यासाठी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
याबाबत फेसबुक टाकलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की,
आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वडील राजेंद्र (दादा) पवार हे गेल्या चार वर्षांपासून बारामती कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने हे प्रदर्शन भरवतात. यामध्ये मत्स्य उत्पादन, विषमुक्त असे हवेवरील भाजीपाला उत्पादन, फळबाग लागवड व विक्री व्यवस्थापन, आधुनिक बांबू लागवड व विक्री व्यवस्था, मातीविना शेतीचे विविध प्रयोग, आंतरपिकांची लागवड, सिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती, पशु-पक्षी प्रदर्शन, फळ-बियाणे प्रक्रिया, आधुनिक शेती औजारं, मुरघास प्रक्रिया, स्वयंचलित खत व पाणी देणारी प्रणाली या आणि अशा अनेक नवनवीन गोष्टी शेतकऱ्यांना पाहता येतील.
या कृषी प्रदर्शनातून बळीराजाला विकासाची नवी दृष्टी, प्रगतीची नवी वाट आणि आत्मविश्वास नक्की मिळेल, असा माझा विश्वास आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांनो चुकवू नका…आपल्या शेतशिवाराला विकासाचं तोरण बांधण्यासाठी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या.
यावेळी आदरणीय शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादा जी भुसे, पशुसंवर्धन मंत्री सुनील जी केदार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत जी कदम, खासदार सुप्रियाताई सुळे, अभिनेते अमीर जी खान हे मान्यवर उपस्थिती होते. तत्पूर्वी सगळ्या मान्यवरांनी या प्रदर्शनाची पाहणी करुन तोंडभरुन कौतुक केलं. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय शेतीची भरभराट होणार नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेल्या या प्रदर्शनाला शेतकरी बांधवांनी अवश्य भेट द्यावी, अशी माझी विनंती आहे.