पवारांच्या कौटुंबिक कारणांमध्ये मला रस नाही- उद्धव ठाकरे

मला कुणाचे वाईट होत असताना आनंद होत नाही, काल पवार कुटुंबाबत घडलं, जे गेले 50 वर्षे आपल्याशी जसे वागले त्यांचे काय झालं? त्यांना परस्पर उत्तर मिळत आहेत, पवारांच्या कौटुंबिक कारणांमध्ये मला रस नाही अस मत उद्धव ठाकरेंनी मांडले आहे. या वेळेस मला सत्ता पाहिजेच, 288 मतदार संघातील इच्छुकांना बोलावलं झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते हा खरा शिवसैनिक  असल्याचे मत यावेळी उद्धव ठाकरेंली मांडले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे पदाधिकारी आणि इच्छुकांची बैठक बोलावली होती.मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या रंगशारदा सभागृहात ही बैठक होत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख आणि इच्छुक या बैठकीला हजर आहेत.

उमेदवारांची निवड करण्याचा काळ हा माझ्यासाठी क्लेषदायक काळ असतो, त्यावेळी अंत:करण तुटत असतं

आम्हाला सत्ता जनतेच्या सेवेसाठी हवी आहे

आम्हाला सत्तेची हाव नाही, आम्ही हावरट नाही

समोर कोणी नसतो तेव्हा धोका असतो, कारण शत्रू कुठून येऊन वार करेल त्याचा नेम नाही

मला बंडखोरी चालणार नाही-उद्धव ठाकरे

जागावाटप हे आजउद्यात होईलच, एखादी जागा अशी असता कामा नये जिथे आपली तयारी नाही

जागावाटपात भाजपला जरी जागा सुटली तरी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता हवी असल्यास खेचाखेची करून चालणार नाही

युती झाल्यानंतर जर त्यांच्या मदतीला ताकद येणार नसेल तर नुसते झेंडे फडकावून उपयोग नाही

आता 2014 राहिलेलं नाही, प्रत्येक मतदारसंघात मला शिवसेना पाहिजे

आम्ही म्हणू ती पूर्व हा आपला जो खाक्या आहे तो सोडू नका

आमचे ठरलेलं आहे, त्याप्रमाणे बोलणं सुरू आहे

खेचाखेचीचे राजकारण जे आजपर्यंत चालू होतं त्याला मूठमाती द्यावी लागेल

युतीबाबतची घोषणा एक दोन दिवसांत होईल

मी राजकारण सोडणार नाही, मी शेती करणार नाही मी शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन

शिवसेनाप्रमुखांनी मी वचन दिलं आहे की एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री मी मुख्यमंत्र्याच्या पदावर बसवेन, त्यासाठी जे करावं लागेल ती मी करेन, ही माझी शपथ आहे

शेतकऱ्याला कर्जमुक्त नाही तर चिंता मुक्त करणार आहे, म्हणून मला सत्ता हवी आहे

अमरावतीच्या नंदकुमार ताडे नावाच्या शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहिले होते की ‘मेलो तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही’

मी तुम्हाला धन्यवाद द्यायला बोलावले आहे, जे पटले नाही त्यावर आपण घणाचे घाव घातले

मी 288 मतदारसंघातील इच्छुकांना बोलावले आहे, म्हणजे युती तुटणार का ..तर नाही

या वेळेला मला सत्ता पाहिजे

10 वर्ष जुने प्रकरण काढून शिवसेनाप्रमुखांवर गुन्हा दाखल केला होता

पोलीस आणि सत्ता हातात असेल तर काहीही करू शकतो

न्यायाधीशांनी अटक होऊ शकत नाही असं म्हणून खटला निकाली काढला

त्यावेळी कोणीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही, आम्हाला त्याची गरजही नाही

शिवसेनाप्रमुख एक दिवस स्वत:च कोर्टासमोर हजर झाले होते आणि जाब विचारला की सांगा माझा गुन्हा काय होता

असाच एक क्षण आपल्यावर आला होता, काही लोकांनी शिवसेनाप्रमुखांना अटक करण्यासाठी दंड थोपटले होते

सूडाने वागलेलं हा महाराष्ट्र पसंत करत नाही

जे आपल्याशी जसे वागले, तीच परस्थिती त्यांच्यावर आली आहे, त्यांचे वाईट व्हावं अशी मी अजिबात चिंतत नाही

आपण जे कमावले आहे ते संघर्ष करून कमावलेले आहे

कोणाचे वाईट होत असताना मला आनंद होत नाही

शिवसैनिक माझ्यासोबत असताना मला कोणतीही भीती नाही

भूतं नमतील पण शिवसैनिक कधीही नमणार नाही- उद्धव ठाकरे

‘पूर्वजांच्या पुण्याईमुळे मी जो काही आहे तो आहे’ असे शिवसेनाप्रमुख म्हणायचे

शिवसेनाप्रमुखांकडे सगळे रिपोर्ट असायचे

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी युतीबाबत बोलत असताना पितृपक्षाबाबत विषय निघाला, मी म्हणालो की आमचा पक्षच पितृ पक्ष आहे, आमच्या वडिलांचा तो पक्ष आहे



ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: