उद्विग्नतेतून मी साहेबांनाही न सांगता राजीनाम्याचा निर्णय घेतला – अजित पवार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ एकच उडाली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुध्दा हालचालींना वेग आला. शुक्रवारपासून ते माध्यमांपासून दूर होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची शोधाशोध सुरू झाली. मात्र आज 19 तासांनंतर ते माध्यमांसमोर आले आहेत. त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. माझ्या राजीनाम्यामुळे नेते व्यथित झाले. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. विवेकबुद्धीमुळे राजीनामा दिल्याचे ते म्हणाले.

अजित पवार बोलताना म्हणाले की, ज्या वेळी असा प्रसंग आता. त्यावेळी मी कोणाला विचारले असते तर त्यांनी राजीनामा नको देऊ असा सल्ला दिला असता. ही माझी चूक होती की काय होते याच्या खोलात मी जात नाही. जे मी न सांगता केलं आणि सर्वांच्या भावना दुखावल्या या बद्दल मी माफी मागतो.

25 हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणतात मात्र बँक नफ्यात आहे, घोटाळा झाल्यावर बँकेला नफा कधी होतो का? असा सवालही अजिपवारांनी विचारला. आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत, 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम असल्याने साहजिकच ईडीकडे प्रकरण गेलं, पण पवार साहेबांचा काडीचाही संबंध नाही. माझ्यामुळे त्यांचं नाव समोर आलं यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. माझ्यामुळे साहेबांची बदनामी झाली यामुळे मला वाईट वाटलं. 

अजित पवार बोलताना म्हणाले की, विधानसभाध्यक्षांना तीन दिवसांपूर्वीच ते मुंबईत कधी येणार असल्याचे विचारले होते. निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सहकाऱ्यांना अडचणीत येऊ नये. आपल्यामुळे त्यांना अडचणीत आणणे योग्य नाही ही भावना माझ्या मनात होती. यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या संचालकीय मंडळावर सर्व पक्षाचे लोक होते, 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला, ज्या बँकेत एवढ्या ठेवीच नाहीत, त्यापेक्षा जास्त रकमेचा घोटाळा त्या बँकेत कसा होऊ शकतो असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले की, राजकीय जीवनात सहकारी संस्था आजही आम्ही सुरळीतपणे चालवण्याचे काम करत आहोत. अनेक दिग्गज नेत्यांनी या संस्थांमध्ये कामे केली आहेत. या काळातही कारखाने कोणत्याही किंमतीत विकले ते पाहिलं तर परिस्थिती लक्षात येईल असेही ते म्हणाले.

सहकारी घोटाळ्याविषयी बोलताना पवार म्हणाले…

  • 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असे बोलले जाते. बँक नफ्यात आहे, घोटाळा झाल्यानंतर बँकेला नफा होतो का असा सवालही त्यांनी विचारला. आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असल्याचेही ते म्हणाले. 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम असल्याने साहजिकच ईडीकडे प्रकरण गेले आहे. मात्र या प्रकरणारा पवार साहेबांशी कोणताही संबंध नसल्याचे अजित पवार म्हणाले.
  • पुढे ते म्हणाले की, घोटाळ्याबाबत सतत आमच्याविषयी बातम्या येत होत्या. फक्त साहेबांमुळे मी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकतो. पण आपल्यामुळे त्या माणसाचं नाव येतं हे पाहून मी व्यथित झालो होतो. राजीनामा देऊन यातून बाहेर पडलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात आली असल्याचे ते म्हणाले. तसेच या सर्व उद्विग्नतेतून मी साहेबांनाही न सांगता राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. तसेच त्यानंतर फोन बंद केला, मुंबईतच एका नातेवाईकांच्या घरी होतो, साहेबांची बदनामी माझ्यामुळे या वयात झाली, त्यात माझाही दोष आहे असे अजित पवार म्हणाले.
  • चौकशीविषयी बोलताना ते म्हणाले की, चौकशी होत असते, मात्र हे प्रकरण 2011 चं आहे. निवडणुकीच्याच तोंडावरच हे प्रकरण पुढे कसं आलं? सरकार म्हणतं कोर्टाने निर्णय दिला मात्र कोर्टाच्या अधिकाराबद्दल मला आदर आहे. पण या सर्व गोष्टीतून मी अस्वस्थ आहे, त्यामुळेच राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. तसेच वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देतोय हे विधानसभाध्यक्षांना कारण मी सांगितलं. मी सिल्वर ओकला का गेलो नाही असेही अनेकांनी विचारले. पण बारामतीत पूरस्थिती होती. दिवसभर मी तिथे होतो, रात्री उशिरापर्यंत लोकांना मदत केली असल्याचे अजित पवार म्हणाले.

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: